दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद !!

WhatsApp Group Join Now

नाशिक शहरातील एका भागात दारूसाठी पैसे न दिल्याने पाच ते सहा तरुणांनी दोन पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ अरे देवा! छतावर स्टंट करताना तरुणाचा तोल गेला आणि तो थेट इमारतीवरून खाली पडला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

ही घटना २ जुलै रोजी संध्याकाळी घडली. इर्शाद युसूफ सय्यद (वय ३९, रा. गोसावी वाडी, नाशिक रोड) हा बिटको चौकातील पेट्रोमाइन नावाच्या पेट्रोल पंपावर काम करतो. त्या संध्याकाळी तो काम आटोपून घरी परतत असताना, वास्को चौकात रोहित गायकवाड आणि विकी हे दोन ओळखीचे लोक त्याला भेटले. त्यांनी इर्शादकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, इर्शादने स्पष्ट नकार दिला.

 

[ पुढे वाचा ⇒ अजगराने ९ सेकंदात जिवंत कोल्ह्याला गिळले, एका फटक्यात शरीरातील पाणी काढून टाकले, जंगलातील थरारक व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

पैसे न मिळाल्याने संतापलेल्या रोहित गायकवाड, सुमित खरे, विकी आणि त्यांचे चार ते पाच साथीदार पेट्रोल पंपावर परतले. त्यांनी इर्शाद सय्यद आणि त्याचा सहकारी वाहिद शेख यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धारदार शस्त्र काढून दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पेट्रोल पंपावर मोठी दहशत निर्माण झाली. आरोपींनी पंप जाळण्याची धमकीही दिली. यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

[ पुढे वाचा ⇒ बस आणि ट्रेननंतर आता विमानात घुसला साप! सर्पमित्राने अवघ्या ३० सेकंदात पकडला साप, बचाव मोहिमेचा व्हिडिओ व्हायरल !! ]

 

👉 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; खेळायला जात असताना घडली धक्कादायक घटना !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Close click here